संसर्गजन्य आजारांत घट

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकार आता निर्बंधमुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देण्यासाठी घालण्यात आलेले अनेक निर्बंध येत्या काही दिवसांत शिथिल होण्याची शक्यता आहे. १५ वर्षांवरील वयोगटातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असल्याने संसर्गाचा धोका आता कमी झालेला आहे ही बाब खरी आहे. मात्र असे असले तरी मास्कची सक्ती शिथिल करू नये. आज सार्वजनिक स्थळांवर व प्रवासात मास्कचा वापर होत असल्याने मुख्यत्वे गर्दीच्या ठिकाणी हवेवाटे पसरणाऱ्या अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होत आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाण निश्चीतपणे कमी झालेले आहे. म्हणूनच सरकारने निर्बंधमुक्ती करताना लगेचच मास्कमुक्ती होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त