महागाईवर बोला काही
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
सध्या राज्यातील माध्यमांवर केवळ ईडी, सिबीआय, आयकर, मालमत्ता, भोंगे यांवरच जास्त चर्चा होताना दिसते. एकीकडे राजकारणी आपापसातील वादांमध्ये व्यग्र असताना दुसरीकडे महागाईने मात्र सर्वसामान्यांचे जगणे असह्य करून टाकलेय. जीवनावश्यक वस्तूंच्या दरांनी अक्षरशः कळस गाठलाय. इंधन, गॅस, खाद्यतेल, विविध सरकारी कर आदींच्या दर दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. सामान्यांच्या घरातील बजेट मात्र या महागाईने पुरते कोलमडून गेले आहे. त्याची नैतिक जबाबदारी निश्चित करून या वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून राज्यकर्त्यांसह प्रसारमाध्यमेही राजकारण्यांच्या भांडणांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आता त्यांना 'महागाईवर बोला काही' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment