मास्कसक्ती नसली तरी मास्क मुक्ती नकोच

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तो पूर्णतः संपलेला नाही हे ध्यानात घ्यायला हवे. सरकारने निर्बंध मुक्ती केलेली असली तरी त्यामुळे बेफिकीर होण्यासारखी परिस्थिती नक्कीच नाही. कारण कोरोनाची साथ कधीही डोके वर काढू शकते. कोरोना रोखण्यासाठी केवळ दोन गोष्टी महत्वाच्या ठरलेल्या आहेत. एक म्हणजे लसीकरण ज्याने रुग्णसंख्या व मृत्यूची आकडेवारी नियंत्रणात आली आहे आणि दुसरे म्हणजे मास्कचा वापर. आज बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने या आजाराचा गंभीर परिणाम शरीरावर होण्याची शक्यता नाही. मात्र संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मास्कचा वापर हा करायलाच हवा. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी दररोज लाखो लोक ये जा करतात. सार्वजनिक प्रवासाची ठिकाणे तर रोज गर्दीने तुडुंब भरून वाहतात. अशा परिस्थितीत ह्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता पाहता किमान मुंबई, उपनगरे, पुणे, नाशिक अशा गर्दीच्या शहरांमध्ये तरी मास्क सक्ती आवश्यक ठरते. मास्क हा आपल्याला कोविड सोबतच इतरही संसर्गापासून लांब ठेवणारा महत्वाचा घटक असल्याने मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती करू नये असे वाटते. 





वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त