वर्षाखेरीस निवडणुका घेणे उचित

ओबीसी आरक्षणावरुन राज्‍यात गदारोळ सुरु असताना सर्वोच्‍च न्‍यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवडयांत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्‍याचे आदेश दिले आहेत. गेल्‍या दोन वर्षांपासुन कोरोना प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका वारंवार पुढे ढकलण्‍यात येत आहेत. त्‍यामुळे कोरोनाची संभाव्‍य साथ, प्रभाग आरक्षणाचा घोळ व येत्‍या पावसाळयाच्‍या पार्श्‍वभुमीवर १५ दिवसांमध्‍ये निवडणूका जाहिर करुनही त्‍या प्रत्‍यक्षात होतील की नाही याबाबत साशंकताच आहे. प्रशासकांच्‍या राजवटीखाली सुरु असलेला कारभार आणखी काही काळ सुरु ठेवून या वर्षाअखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे उचित ठरेल. तोवर ओबीसी आरक्षणाचा मुददादेखील निकाली निघेल.  


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त