प्रसाधनगृहे सोयीस्कर हवीत

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील कुठल्याही स्थानकातील फलाटावर प्रसाधन गृह नाही. यामुळे प्रवाशांची विशेषतः लहान मुले, वृद्ध व महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. प्रसाधन गृह गाठण्यासाठी थेट रेल्वे स्टेशनबाहेर जावे लागते. ही प्रसाधनगृहे रेल्वे स्थानकात एका कोपऱ्यात बनवण्यात आली आहेत जी शोधण्यासाठीदेखील मोठी तारेवरची कसरत करावी लागते. ही प्रसाधनगृहे खरेतर तर रेल्वे स्थानकातील फलाटावर असायला हवीत जेणेकरून प्रवाशांच्या सहज दृष्टीपथात पडतील व त्यांच्या कामी येतील. या मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके सुंदर, स्वच्छ, प्रशस्त व अवाढव्य असून सदर स्थानकातील प्रसाधनगृहांची ही रचना मात्र खटकते. याचा रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व प्रसाधनगृहे लोकांना सोयीस्कर होतील अशा ठिकाणी फलाटावर तयार करावीत. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त