गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी मालिका
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका विकृती व गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी आहे. मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये डझनभर खून करूनदेखील सहीसलामत सुटलेला डॉ अजित कुमार उर्फ देवी सिंग हा नटवर बनून त्याच गावात परततो व पुन्हा लोकांची उघड लूट व खुनांची मालिका सुरू करतो हे न पटण्यासारखे आहे. पोलिसांना देखील हातोहात चकवणाऱ्या अजितची भूमिका चीड आणणारी आहे. दुसऱ्या सीझनमध्ये दोन महिला व एक लहान मुलीची हत्या करून गावकऱ्यांचे लाखो रुपये लाटण्यात तो यशस्वी झालेला आहे. तरीदेखील पोलिसांच्या हातात कुठलाही पुरावा लागत नाही ही अतिशयोक्ती असून पोलिसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी बाब आहे. अजितवर प्रचंड अंधविश्वास असणारे बज्या व नाम्या तसेच त्याला प्रत्येक गुन्ह्यात साथ देणारी डिंपल ह्यांच्या भूमिकादेखील न पटणाऱ्या आहेत. अंध असणाऱ्या सरुआजीला व चिमुरड्या मुलीला अजितमधील राक्षस दिसतो मात्र इतरांना तो दिसत नाही हे अनाकलनीय आहे. यातून मालिकेच्या प्रेक्षकांना नक्की कोणता संदेश द्यायचा आहे?
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment