हसतमुख संयमी व हरहुन्नरी अधिकारी डॉ संजय जयस्वाल सेवानिवृत्त
*नागपूर आरोग्य उपसंचालक डॉ जयस्वाल सर देखील निवृत्त*
डॉ संजीव जयस्वाल हे आरोग्य विभागातील जेष्ठ व अनुभवी अधिकारी आज उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. विभागातील सर्वांचे लाडके, हरहुन्नरी व सदा हसतमुख अधिकारी म्हणून डॉ जयस्वाल सरांचा मी उल्लेख करीन. विदर्भातील आरोग्य सेवा सक्षम व सर्वसमावेशक करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आरोग्य विभागातील आपली प्रदीर्घ सेवा त्यांनी विदर्भातच केली. उच्चविद्याविभूषित असलेल्या जयस्वाल सरांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक पदव्या धारण केल्या आहेत. त्यांचे उत्तम नेतृत्व, नियोजन कौशल्य व शांत संयमी स्वभाव यामुळे विदर्भाची जबाबदारी त्यांनी गेली अनेक वर्षे लीलया पेलली. अगदी पूर्वी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुंबईतील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, निवास व्यवस्था ते अधिवेशनाचे कामकाज, ते सर्व नियमित जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडायचे. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे कुठली उणीव वरिष्ठांना भासली नाही. असे सदाबहार व नवचैतन्याची खाण असलेले डॉ जयस्वाल सर निवृत्त होताहेत असे वाटतच नाही. निवृत्तीनंतरही एखाद्या रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेचा त्यांचा मानस आहे जो त्यांच्यातील आरोग्यदाता जागृत असल्याचे दर्शवतो. मागील आठवड्यात ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांना माझे आरोग्यमंथन भेट दिले व सेवनिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छादेखील. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग आरोग्य सेवेला भविष्यातही व्हावा अशी मनोकामना व्यक्त करतो.
वैभव
Comments
Post a Comment