शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल आवश्यक
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
दहावी-बारावीच्या निकालाचे आकडे दरवर्षी वाढत आहेत. यंदा दहावीचा राज्याचा निकाल जवळपास ९७% लागला. अनेक शाळांतील १००% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वास्तविक निकालाची ही स्थिती आशादायी असली तरी भविष्याची चिंता वाढवणारीही आहे. याने महाविद्यालयीन व उच्च शिक्षणातील प्रवेश, स्पर्धा परीक्षांची तयारी, रोजगार क्षेत्रामध्ये प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. जागा कमी आणि उमेदवार अधिक ही परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यातून मग शिक्षण क्षेत्रात वशिलेबाजी, आर्थिक तडजोडीसारखे प्रकार घडण्याची शक्यतादेखील बळावते. लाखोंच्या संख्येने दरवर्षी विविध शाखांमधून यश मिळवत बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेव्हढ्या संधी उपलब्ध आहेत का याचा विचार करायला हवा. यासाठी महाविद्यालयीन, उच्च व तंत्र शिक्षणाला पर्याय आणणे अपरिहार्य आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा कलागुण जोपासणाऱ्या व त्या कलागुणांच्या आधारे स्वयंरोजगाराच्या वाटा चोखाळणारी शिक्षण पद्धती अंमलात आणणे काळाची गरज आहे. व्यवसाय व रोजगाराभिमुख शिक्षण भावी पिढीला लाभदायी ठरेल. केवळ उच्च पदव्या मिळवून देणारे नव्हे तर भविष्यात पायावर उभे राहायला शिकवणारे शिक्षण गरजेचे आहे. बेरोजगारी व शिक्षणासाठीचा संघर्ष संपवायचा असेल तर सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल क्रमप्राप्त ठरतात.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment