कौटुंबिक चौकट मोडणारी मालिका

सासू-सून मालिकांची परंपरागत चौकट मोडत वेगळा विषय 'तुमची मुलगी काय करते' या झी मराठीवरील मालिकेतून हाताळण्यात आला आहे. एकीकडे ड्रग्‍ससारख्‍या गोरख धंदयातून माफीयांच्‍या तावडीत सापडलेली सावनी व दुसरीकडे तिला शोधण्‍याच्‍या प्रयत्‍नात अनेक नाटयमय व जिवघेण्‍या घटना वाटेला आलेली तीची आई श्रध्‍दा मिरजकर यांच्‍याभेवती ही कथा फिरते. थरारक व उत्‍कंठावर्धक कथानकामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. सावनीचा हरएक प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न तिचे कुटुंबीय व पोलीस करत आहेत. सध्‍या ही मालिका अंतिम टप्‍प्‍यात असुन त्‍यातुन ड्रग्‍ज रॅकेट तसेच मानवी तस्‍करीसारख्‍या गंभीर गुन्‍हयांचे वास्‍तव समोर आणले गेले आहे. मालिकेतील कलाकारांचा दर्जेदार अभिनय, उदबोधक व खिळवुन ठेवणा-या कथेमुळे ही मालिका नक्‍कीच एक वेगळया धाटणीची असुन कौटुंबिक मालिकांची नेहमीची चौकट मोडणारी आहे.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई  


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त