दुचाकीस्वारांची चिंता वाढवणारा निर्णय

मुंबईत चालकासह सहप्रवाशालादेखील हेल्‍मेटसक्‍तीचा निर्णय दुचाकीस्‍वारांची चिंता वाढवणारा आहे. दुचाकीवरुन शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी ही हेल्‍मेट सक्‍ती करणे योग्‍य ठरणार नाही. शहरातील ट्रॅफीक, खडडेमय रस्‍ते, जागोजागी सिग्‍नल व स्‍पीड ब्रेकर्सची संख्‍या पाहीली तर कुठलीही दुचाकी शहरातील रस्‍त्‍यावर ताशी २० ते ३० किमीपेक्षा जास्‍त वेगात धावत नाही. त्‍यामुळे अशा रस्‍त्‍यांवर अपघाताची शक्‍यता जवळपास नाहीच. शिवाय जवळच्‍या अंतरावरील प्रवासासाठी, मुलांना शाळेत नेताना, बाजारात जाताना चालकासह सोबत बसणा-या महिला, वृध्‍द, लहान मुलांनादेखील हेल्‍मेटसक्‍ती करणे अनाकलनीय आहे. त्याऐवजी मुंबईतील वाढती वाहनसंख्या, त्यामुळे होत असलेली सततची वाहतूक कोंडी, अवैध पार्किंगची समस्या, खराब व अरुंद रस्ते यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. उपनगरांतील महानगरपालिकांमध्‍ये हेल्मेट सक्तीचा हा नियम नसताना केवळ मुंबईत सक्‍ती करुन काय साध्‍य होणार हादेखील प्रश्‍न आहेच. त्‍यामुळे या निर्णयाचा पूनर्विचार होणे आवश्‍यक आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई     


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त