क्रिकेटशिवाय अन्य खेळांनाही सावरा

छछोरी छनछन हे संपादकीय (दै लोकसत्‍ता १४ जून) भारतीय क्रिकेट विश्‍वाचे वास्‍तव समोर आणणारे आहे. आयपीएल या साडेतीन तासांच्‍या गेम शो ने भारतीय क्रिकेटला प्रसिध्‍दीच्‍या शिखरावर पोहोचवले. मात्र त्‍याचबरोबर इतर क्रिडाप्रकांराची मात्र पार लयाच घालवली. प्रायोजकांनी आणि क्रिकेटरसिकांनी आयपीएलला धनसंप्‍पन्‍न बनवले मात्र त्‍याचबरोबर देशातील पारंपारीक क्रिडाप्रकार मात्र सपशेल दुर्लक्षित होऊ लागले. याने अदयाप क्रिकेटही धड सावरु शकलेले नाही ना इतर खेळ. त्‍यामुळे आयपीएलच्‍या छनछनीतुन नक्‍की काय साध्‍य होतेय यावर विचारमंथन व्‍हायला हवे. एकीकडे कोरोनाने मंदावलेल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा व वाढत्‍या महागाईचा सामना करताना सरकारची दमछाक होत असताना देशात आयपीएलमधुन निघत असलेला हा धुर डोळे चुरचुरवणारा आहे. आता या धुरातून क्रिकेटव्‍यतीरीक्‍त अन्‍य खेळ, लोकोपयोगी योजनांचे घोंगडे न्‍हाऊन काढण्‍याची वेळ आली आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
          


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त