नवी मुंबईत पार्किंगचा प्रश्न गंभीर

वाढत्या वाहनांमुळे नवी मुंबईमधील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या वाहनांनी निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला जात आहे व रहदारीस त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबईतील सर्वच रस्त्यांची अवस्था अशीच असून या बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. रहिवाशी संकुलांमध्येदेखील इमारतींसमोरील रस्त्यांवर ही वाहने सर्रास उभी केली जातात. एकही असा रस्ता सापडत नाही जिथे अनधिकृतपणे उभी असणारी वाहने नाहीत. यामुळे बऱ्याचदा इमारतींमधून वाहने बाहेर काढताना, अरुंद रस्त्यांवर दोन चारचाकी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होतो. अनेक वाहने तर महिनोंमहिने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसतात. नागरी स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनदेखील ही वाहने अत्यंत धोकादायक असल्यामुळे वेळीच अशा बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेणे किंवा ती जप्त करणे क्रमप्राप्त ठरते. या वाहनांचा वाली कोण असा प्रश्नही अनेकदा पडतो. भर रस्त्यात उभी करण्यात येणारी ही वाहने रहदारीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करणारी यंत्रणा वाहतूक विभाग अथवा महानगरपालीकेने उभारावी. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त