राजकीय धक्के जनतेला नवे नाहीत
- Get link
- X
- Other Apps
गेल्या दोन दिवसांपासुन राज्यातील राजकारण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ढवळुन निघाले आहे. प्रसारमाध्यमे दिवसरात्र यासंदर्भात लाईव्ह घडामोडी दाखवण्यात व्यस्त आहेत. कधी नव्हे अशी अभूतपूर्व परिस्थीती सध्या सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेली असली तरी राज्यातील जनतेला त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सत्तेबाबत मोठी संदिग्धता असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते हे यापुर्वीच्या काही घटनांनी सिध्द झाले आहे. त्यामुळे राजकीय धक्के राज्यातील जनतेला नवे नाहीत. त्यामुळे कोणाचेही सरकार सत्तेवर आले तरी सर्वसामान्य जनतेला फार काही फरक पडेल असे वाटत नाही. शेवटी लोककल्याणकारी निर्णय घेणारे व ते राबवणारे शासन जनतेला अपेक्षित असते. त्यामुळे हे राजकीय नाटय सर्वसामान्यांनी फार गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment