वेब सिरीज सेन्सॉर कक्षेत आणा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
सध्या निरनिराळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून रिलीज होत असलेल्या वेब सिरीज मधून अश्लील संवाद व चित्रीकरणाचा मारा दर्शकांवर सुरू आहे. हिंदीसोबतच मराठी वेब सिरीजमधूनदेखील ही अश्लीलता आता दिसू लागली आहे. वेब सिरिजच्या प्रोमोमधून तरुण वर्गाला आकर्षित केले जाते. भडक आणि अश्लील संवादफेकीतून वेब सिरिजना रंजक मुलामा देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील कुठलीही वेब सिरीज कुटुंबासमवेत पाहण्याच्या लायकीची नाही. वेब सिरीज शेवटच्या भागात आटोपती न घेता पुढील सिझनची प्रतीक्षा दर्शकांना लावली जाते. अशा अनेक मराठी व हिंदी वेब सिरीज तरुणाईला आकर्षित करून गुन्हेगारीचे विकृत दर्शन घडवत आहेत. सेन्सॉरचे कुठलेही नियम या सिरीजना लागू नसल्याने बेलगाम पद्धतीने कथानक रंगवले जाते ज्यात भडक दृश्ये व भाषेचा वापर केला जात आहे. तरुणाईला बिघडवणाऱ्या अशा वेब सिरीजवर बंधने आणण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात वाढत चाललेल्या विकृती व गुन्हेगारीला कुठेतरी या वेब सिरीज जबाबदार आहेत. त्यामुळे अशा वेब सिरीजना आवर घालुन त्यांना सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment