श्री समर्थ विद्यालय जोगेश्वरी चा १०० टक्के निकाल
श्री समर्थ विद्यालय जोगेश्वरी चा १०० टक्के निकाल
मुंबई - गणेश हिरवे
माध्यमिक शिक्षा परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा जोगेश्वरी पूर्व बांद्रेकरवाडी येथील श्री समर्थ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सिद्धी ज्ञानेश्वर सत्रे ही संपूर्ण शाळेतून ८७.४० टक्के गुण मिळवून प्रथम, तर पूर्णिमा रामदास तरळ ८६.६० व अर्चना सचिन चिमलगी ८३.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वातिय आणि तृतीय आल्या.संस्थेचे अध्यक्ष डॉ वळंजू यांनी शाळेचा निकाल १०० टक्के लागल्यामुळे शाळेतील शिक्षक, पालक,सर्व विद्यार्थी संस्थेचे पदाधिकारी यांचे कौतुक केल्याचं शाळेचे मुख्यद्यापक मधुकर पोर्लेकर यांनी संगितले.या शाळेत शिकणारी बहुतांश मूल ही आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्यातील आहेत व त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे डॉ वळंजू यांनी नमूद केलं.
Comments
Post a Comment