हेल्मेटसक्ती गैरसोयीची

मुंबईत १० जूनपासुन हेल्‍मेटसक्‍तीची अंमलबजावणी होणार असल्‍याने दुचाकीस्‍वारांची चिंता वाढणार आहे. दुचाकीवरुन शहरांतर्गत प्रवासासाठी चालकासहीत सहप्रवाशालादेशील हेल्‍मेट सक्‍ती करणे योग्‍य ठरणार नाही. शहरातील ट्रॅफीक, खडडेमय रस्‍ते, जागोजागी सिग्‍नल व स्‍पीड ब्रेकर्सची संख्‍या पाहीली तर कुठलीही दुचाकी शहरातील रस्‍त्‍यावर ताशी २० ते ३० किमीपेक्षा जास्‍त वेगात धावत नाही. त्‍यामुळे अशा रस्‍त्‍यांवर अपघाताची शक्‍यता नाहीच. शिवाय जवळच्‍या अंतरावरील प्रवासासाठी, मुलांना शाळेत नेताना, बाजारात जाताना चालकासह सोबत बसणा-या महिला, वृध्‍द, लहान मुलांनादेखील हेल्‍मेटसक्‍ती करणे अनाकलनीय आहे. शिवाय उपनगरांतील महानगरपालिकांमध्‍ये हा नियम नसताना केवळ मुंबईत सक्‍ती करुन काय साध्‍य होणार हादेखील प्रश्‍न आहेच. त्‍यामुळे या निर्णयाचा पूनर्विचार आवश्‍यक आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई     


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त