विद्यार्थ्यांचा हुरूप वाढवणारा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच एचएससी बोर्डाचा निकाल  बुधवारी जाहीर झाला. राज्यातील ९४.२२ टक्‍के मुले उत्‍तीर्ण झाली आहेत. कोकणाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के असून मुंबईचा सर्वात कमी ९०.९१ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेल्‍या १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्‍बल १३ लाख ५६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोना संकटात दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. कोरोना काळात दोन वर्ष परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. शाळाही बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही आव्हानं वाढली होती, अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा देण्याचं टेंशन विद्यार्थी आणि पालकांना होतं. मात्र गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत य निकालात ४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांच्‍या उच्‍च  शिक्षणाच्‍या वाटा खुल्‍या होतात. वैद्यकीय, इंजिनिअरींग, आर्कीटेक्चर, नर्सींग अशा विविध क्षेत्रांतील प्रवेशासाठी सीईटीसोबतच बारावी परीक्षेलाही महत्त्व असतं. यंदाचा निकाल बारावीसह बारावीपर्यंतच्‍या सर्व विदयार्थ्‍यांचा हुरुप वाढवणारा असून मुले नक्‍कीच अधिक जोमाने अभ्‍यासाला लागतील. तसेच कोरोनाच्‍या मोठया खंडानंतर विदयार्थ्‍यांच्‍या अभ्‍यासात निर्माण झालेली दरी दूर करण्‍याचे काम हा निकाल करेल व उत्‍तीर्ण विदयार्थी नव्‍या उर्जेने उच्‍च शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करतील अशी आशा आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त