गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जात आहे. खून, अत्याचार, आर्थिक अपहार, बोगस डॉक्टरकी, फसवणूक यासारखे अनेक गुन्हे करून सहीसलामत वावरत असलेला डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंग अजूनही पोलिसांच्या हाती लागायला तयार नाही. उलट इन्स्पेक्टर जामकर ह्या एका कर्तव्यदक्ष पोलिसालाच तो थेट खुले आव्हान देताना मालिकेत दिसतो. एक महिला आमदाराला हाताशी धरून तिचा काळा पैसा व सोने पांढरा करण्याचे काम करणारा डॉक्टर अजित तिच्या सांगण्यावरून तिच्या माजी आमदार असलेल्या पतीला कुणीही साथीदार नसताना स्वतः एकटाच अपहरण करून गावातच गायब करतो ही कुणालाही न पटणारी अतिशयोक्ती आहे. भामटेगिरीशिवाय इतर कुठलेही उद्योग न करणारा गर्भश्रीमंत असलेला डॉक्टर, त्याच्यावर अंधविश्वास ठेवणारे गावकरी, पैशासाठी त्याला प्रत्येक गुन्ह्यात मदत करणारी त्याची पार्टनर डिंपल व सर्वकाही माहीत असूनही त्याचे काहीही बिघडवू न शकलेले हतबल पोलीस हे सर्व दर्शकांची निराशा करतात. अन्याय, अत्याचार, लबाडी, खून करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे इतके उदात्तीकरण शोभनिय नाही. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई  

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त