सांघिक विजय ही जमेची बाजू
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
इंग्लंडमधील मालिका विजयांसह भारतानं अनेक विक्रमही आपल्या नावावर केलेत. टीम इंडिया २०१५ पासून गेल्या आठ वर्षांत वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ आहे. यादरम्यान इंग्लंडने सात संघांविरुद्ध १५ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २०१५ मध्ये आणि २०२० मध्ये पराभव केला होता. भारतीय संघानं २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडविरुद्ध आठ एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळल्या आहेत. यापैकी टीम इंडियाने सात मालिका जिंकल्या. केवळ २०१८ मध्ये इंग्लंडनं घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताला २-१ ने पराभूत केलं होतं. उर्वरित सात मालिका भारतानं घरच्या मैदानावर आणि इंग्लंडमध्ये जिंकल्या आहेत. इंग्लंड हा संघ घरच्या मैदानावर सर्वात प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याला पराभूत करून भारतीय संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे. विराट कोहली सारखे भारताचे काही खेळाडू खराब फॉर्ममुळे झगडत असले तरी सांघिक विजय ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. भारतीय संघाने आपली ही यशस्वी वाटचाल अशीच कायम सुरू ठेवावी असे वाटते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment