तर विराटने क्रिकेटपासून दूर व्हावे

एकेकाळी क्रिकेट विश्वात नंबर एकचा खेळाडू असलेला विराट कोहली सध्या खराब खेळीमुळे क्रिकेटरसिकांच्या टीकेचा धनी बनलेला आहे. सध्याच्या इंग्लड दौऱ्यातदेखील त्याने पुरती निराशा केली आहे. त्यात आता आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठी त्याने विश्रांती देण्याची मागणी केली आहे. यावरून त्याचा आत्मविश्वास हरवत चालल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पहिल्या फळीतील खेळाडूंनी देशासाठी खेळताना आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी झालेल्या चुका शोधून त्यावर मात करणे अपेक्षित आहे. मात्र विराटने त्यातूनही पळ काढत नेमके देशासाठी खेळण्याच्या वेळी विश्रांतीची केलेली मागणी योग्य ठरत नाही. आयपीएलसारख्या अर्थकमाईच्या प्रकारांत हे खेळाडू अविश्रांत खेळत राहतात. मात्र देशासाठी खेळण्याच्या वेळी मनाजोगे, हवे तेव्हा खेळण्याची भूमिका ठेवतात ही भारतीय क्रिकेटसाठी भूषणावह बाब नाही. त्यामुळे खेळात सातत्य ठेवता येत नसेल व चांगली कामगिरी करण्याची इच्छाशक्ती नसेल तर विराटने भारतीय संघातील जागा अधिक काळ न अडवता क्रिकेटपासून दूर झालेले बरे! 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त