हे राजकीय समीकरण

मुळात भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित राजकीय पक्ष आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचा मोठा पगडा या पक्षावर आहे. दलित, ब्राह्मण, मराठा अशी जातीय समीकरणे गेल्या काही वर्षांपासून राजकीय सोयीसाठी आणली जात आहेत व त्याचा फायदा राजकीय पक्ष उचलताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर मागील ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना त्यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाने सोयीस्कररित्या दूर ठेवले. यामुळे भाजपमध्ये ब्राम्हणांचे खच्चीकरण होत असल्याचे ब्राम्हण महासंघाचे म्हणणे मात्र विसंगत आहे. मुळात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भाजपने सर्वसमावेशक धोरण अवलंबले व  अनेक राज्यांमध्ये स्थानिक राजकीय परिस्थीतीनुसार नेत्यांना पदवाटप केले. त्यात ब्राह्मणवादी विचारसरणीचा पगडा सकृतदर्शनी दिसत नाही. महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभाव जोपासणारे राज्य असले तरी राज्याला जातीय परंपरेचा मोठा वारसा आहे जो समाजात मुळापर्यंत रुतलेला आहे. भाजपकडे बहुमत असताना व फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी स्पष्ट शक्यता असताना राजकीय नाट्याचे शिल्पकार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपची अनेक राजकीय समीकरणे दडलेली आहेत. राजकारणातील जातीय समीकरणे सर्वसामान्य जनतेच्या आकलनापलीकडली असून विकासाच्या दृष्टिकोनातून व प्रामाणिक हेतूने काम करणाऱ्या राजकीय पक्ष, पुढाऱ्यांचे आकर्षण त्यांना अधिक असते. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त