कसे जायचे इतक्या दूर, आमचे इथेच पंढरपूर

आषाढी निमित्त काटी गावात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

https://youtu.be/Hqbg6iHeZds

आषाढी एकादशी निमित्त पालघर जिल्ह्यातील काटी (ता वाडा) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात तसेच हनुमान मंदिर परिसरात दिंडीचे आयोजन केले. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी भाविक पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. वाडा तालुक्यातून देखील पायी दिंडीतुन तसेच निरनिराळ्या वाहनांमधून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र यंदा पावसामुळे अनेकांच्या वारीवर मर्यादा आल्या. त्यांना वारकरी दिंडीचा आनंद गावातच मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी गाव परिसरात काढलेल्या दिंडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या छोट्या वारकऱ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ह्या दिंडी उपक्रमास ग्रामस्थांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन व जतन करणाऱ्या ह्या उपक्रमामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून शाळेचे कौतुक होत आहे. 

वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त