असा साजरा करा गणेशोत्सव


यंदाच्या गणेशोत्सवावर कुठलेही निर्बंध नसल्याने ग्रामीण व शहरी भागात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार या शंका नाही. यासाठी आकर्षक व भव्य दिव्य गणेशमूर्ती, सजावट, आरास करण्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल आहे. कोरोना व इतर साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव पाहता या उत्‍सवाला आरोग्‍य उत्‍सव म्‍हणून साजरा करण्‍यासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्‍यायला हवा. सार्वजनिक मंडळांनी प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच आरोग्‍य उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्‍सव साजरा करावा. उत्‍सव काळात आरोग्‍य व रक्‍तदान शिबीरे आयोजित करणे, विविध संसर्गजन्‍य व असंसर्गजन्‍य आजारांचे रुग्‍ण शोधणे, त्‍यांना औषधोपचार मिळवून देणे, आरोग्‍यासाठी जनजागृती करणे, आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने परिसरातील नागरीकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबीरे आयोजित करणे, गंभीर व दुर्धर आजाराच्‍या रुग्‍णांच्‍या दिर्घकालीन उपचारांसाठी मदत मिळवून देणे, विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे यासारखी अनेक कामे या गणेशोत्‍सवादरम्‍यान करता येतील. एकंदरीत, येणाऱ्या श्रीगणेश उत्‍सवाची व मूर्तींची भव्‍यता यंदा वाढलेली असल्यामुळे आपली सामाजिक जाणीवेची पातळीदेखील उंचावण्यासाठी या गणेशोत्सवाचा उपयोग व्हायला हवा.     


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा