सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण शाळेत शैक्षणिक साहित्‍याचे वाटप

 विविध स्‍वयंसेवी संस्‍थाकडून, दानशूर व्‍यक्‍तींकडून मदतीचा हात

देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्‍ट अंतर्गत सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण ही शाळा गेल्‍या २० वर्षांपासुन आदिवासी, दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करत असुन शाळेत ८वी ते १०वी पर्यंत माध्‍यमिक वर्ग कार्यरत आहेत. परिसरातील आदिवासी व गरीब कुटुंबातील शेकडो मुलांना या शाळेमुळे लाभ झालेला आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती व गुणवत्‍तादेखील वाखाणण्‍याजोगी असुन दरवर्षी दहावीच्‍या उत्‍तूंग निकालातून ती प्रतीत होत असते. शाळेतील अनेक मुलांनी क्रिडा क्षेत्रात उंच भरारी घेत तालूका, जिल्‍हा, राज्‍य पातळीवर आपले व शाळेचे नाव कोरले आहे. वर्जेश्‍वरी, गणेशपुरी यासारख्‍या नैसर्गिक, पवित्र व पर्यटनस्‍थळापासुन हाकेच्‍या अंतरावर वसलेली ही शाळा मुलांच्‍या कलागुणांमुळे उत्‍तरोत्‍तर चांगली कामगिरी करत आहे. यामुळेच समाजातील अनेक दानशूर मंडळी सढळ हस्‍ते या शाळेसाठी व मुलांसाठी मदत करताना दिसतात. नुकतेच २५ ऑगस्‍ट २०२२ रोजी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन यांच्‍या संयुक्त विद्यमाने या  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, वह्या, कंपास यांचे वाटप करण्‍यात आले. तसेच याच दिवशी परमजूज्‍य श्री नित्‍यानंद बाबांचे परम भक्‍त भरत ठिय्या, मुंबई ग्रुप यांच्‍या माध्यमातून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्‍यात आले. तसेच देवघर गावातील एक होतकरु समाजसेवक व संस्‍थेचे माजी विदयार्थी श्री कल्‍पेश पुंडलीक पाटील हेदेखील सातत्‍याने विविध दानशुर व्‍यक्‍ती,  संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन शाळेला मदतीचे आवाहन करत असतात व त्‍या माध्‍यमातुन सातत्‍याने ते विविध स्‍वरुपाची मदत शाळेला व विदयार्थ्‍यांना मिळवून देत असतात. नुकतेच त्‍यांनी त्‍यांच्‍या ठाणे येथील सदिच्छा फाउंडेशन या स्‍वयंसेवी संस्थेकडून बोरवेल, मोटर, पंप व इतर गरजेचे साहित्य शाळेला उपलब्‍ध करुन दिले. तसेच शाळेतल्‍या १० गुणवंत व गरजू मुलांना प्रत्‍येकी १००० रुपयांची शिष्‍यवृत्‍तीदेखील प्रदान केली. शाळेप्रती दाखवलेल्‍या या उदात्‍त भावनेबददल व मदतीबददल सर्व दानशुर व्‍यक्‍तींचे व स्‍वयंसेवी संस्‍थांचे शाळेच्‍या व संस्‍थाचालक श्री के जी पाटील यांच्‍या वतीने आभार व्‍यक्‍त करण्‍यात आले असुन पालक व परिसरातील ग्रामस्‍थांकडूनदेखील कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.    

 

वैभव पाटील






































Comments

  1. Very nice & very well presentaion of reporting sir,thanks for your reporting.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त