नग्नतेची नेमकी व्याख्या तरी काय?
- Get link
- X
- Other Apps
रणविर सिंग या अभिनेत्याने न्यूयॉर्कमधील एका मासिकासाठी नग्न फोटोशुट केले आणि कुठल्याही प्रकाशित घटनेचा बाऊ करुन त्याचा स्वतःच्या प्रसिध्दीसाठी वापर करणा-यांनी टिकेव्दारे त्याचा फायदा घेतला नसता तरच नवल ठरले असते. यामुळे नग्नतेच्या व्याख्या आज अधिक ठळकपणे विषद करण्याची गरज भासताना दिसत आहे. सध्या विविध ओटीटी अॅप्लीकेशन्सवर राजरोसपणे प्रसिध्द होत असलेले चित्रण अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे ठरत आहे. त्याच्यावर म्हणावा तितका प्रहार करताना कुणी दिसत नाही. पायाभुत सुविधा विकासामध्ये उघडे नागडे झालेले रस्ते व इतर निकृष्ट कामांवर आवाज उठवताना राजकीय अपवाद वगळता कुणी दिसत नाही. गड किल्ल्यांसारख्या पर्यटनाच्या ठिकाणी सुरु असलेले अनैतिक व किळसवाणे प्रकार थोपवण्यासाठी प्रयत्नही तोकडेच पडतात. मात्र एखादया प्रसिदध कलावंतांने कपडे न घालता एका विदेशी मासिकासाठी केलेले चित्रण प्रचंड चर्चेत येते याला काय म्हणावे. अर्थात भारतीय संस्कृतीत शरीर झाकेल व शरीराला शोभतील असे कपडे घालण्याची परंपरा आहे हे सत्यच आहे. त्यामुळे नग्न चित्रण वा फोटो करणे, दाखवणे, पाहणे यावर बंधने असायलाच हवीत. मात्र यासाठी नग्न छायाचित्रे काढण्यास प्रवृत्त करणारी व ती प्रसिध्द करणारी मासिके, वृत्तपत्रे, नियतकालिकेच सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची मागणी व्यवहार्य ठरली असती. मात्र असे चित्रण किंवा फोटोशुट करणा-या कलावंतालाच टार्गेट करणे म्हणजे चोर सोडुन केवळ त्याच्या साथीदारालाच शिक्षा करण्यासारखे झाले.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment