महाराष्ट्रातील नोकऱ्यांत महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याची अट हवी

राज्यातील उद्योगधंद्यांमध्ये स्थानिकांना किती रोजगार मिळाला हे पडताळून पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये देशी विदेशी उद्योगांचे जाळे बऱ्यापैकी पसरले आहे. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवार किती सामावून घेतले याची आकडेवारी उघड व्हायला हवी. राज्यसेवा, लोकसेवा, सरळ सेवा सारख्या सरकारी भरती प्रक्रियांमध्ये महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याची अट ठेवली जाते. त्यासाठी मोजक्या जागांसाठी राज्यातील लाखो उच्चशिक्षित तरुण अर्ज करतात. त्यावरून राज्यातील बेकारीची दाहकता लक्षात येते. नोकरभरतीत राज्यातील रहिवाशी असल्याची अट खाजगी उद्योगांसाठीदेखील लागू केल्यास स्थानिक बेरोजगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे वाटते.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा