ऍम्युकेअर ऍक्ट नाऊ संस्‍थेचा स्‍तूत्‍य उपक्रम

अन्‍नदानातून समाजकार्य 


अन्‍नदान हे श्रेष्‍ठ दान मानले जाते. अन्‍नादानातून मिळणारे समाधान अवर्णनीय असते. समाजातील अनेक दानशुर लोक विविध माध्‍यमांव्‍दारे अन्‍नदानासाठी आग्रही असतात. मुंबईतील अशीच एक संस्‍था सध्‍या ठाणे पालघर जिल्‍हयात ग्रामीण भागातील गरीब, गरजू लोकांना पोटभर अन्‍न खाऊ घालण्‍याचे स्‍तुत्‍य समाजकार्य करण्‍यात व्‍यस्‍त आहे. ऍम्युकेअर ऍक्ट नाऊ, मुंबई या संस्‍थेमार्फत हे समाजकार्य हाती घेण्‍यात आलेले आहे. गणेशपुरी स्थित श्री नित्‍यांनंद बाबांच्‍या आशिर्वादाने श्री भरत ठिया या समाजसेवकांच्‍या माध्‍यमातून संस्‍थेने या परिसरात कोविड प्रादुर्भावाच्‍या काळापासुन मार्च २०२० पासुन परिसरातील गावांमधील गरीब व गरजू लोकांना मोफत जेवण देण्‍याचा उपक्रम सुरु केला जो आजदेखील या परिसरात सुरु आहे. अकलोली कॉलनी, उसगाव, गांधी पाडा या ठिकाणी त्‍यांनी अन्‍नदान केले आहे. सध्‍या या संस्‍थेमार्फत केळठण (जि.पालघर) येथील सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, गोराड अवचित पाडा येथील जिल्‍हा परिषद शाळा तसेच देवघर येथील के. जी. पाटील विदयालय या शाळांमधील विदयार्थ्‍यांना दररोज मध्‍यान्‍न भोजन देण्‍यात येत आहे. मध्‍यान्‍ह भोजनामुळे मुलांचा आहार व शाळेतील उपस्थितीवर सकारात्‍मक परिणाम होत असल्‍याचे शिक्षकांचे म्‍हणणे असुन त्‍यामुळे मुलांना अभ्‍यासासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असल्‍याचेही दिसुन येत आहे. एकंदरीत विदयार्थी व परिसरातील गरजूंसाठी अन्‍नदानासारखे पूण्‍यकर्म करणा-या ऍम्युकेअर ऍक्ट नाऊ या संस्‍थेचे तसेच या संस्‍थेचे श्री भरत ठिया यांचे शाळा प्रशासन तसेच पालकवर्गाकडून कौतूक होत आहे.             









Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त