गृहपाठ बंद करू नये
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ रद्द करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाची घरी उजळणी करण्याचे काम गृहपाठ करत असतो. अशा प्रकारच्या उजळणीसाठी आजकाल खाजगी ट्युशन, क्लासेस मुलांना लावले जातात. मात्र सर्वच मुले अशा ट्युशनमध्ये जात नाहीत. अनेक पालक आपल्या मुलांचा घरीच अभ्यास घेतात. अशावेळी गृहपाठातून मुलांना व पालकांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाचे आकलन होते. मुलांना अभ्यासात तरबेज व अचूक बनवण्यात ह्या गृहपाठाची भूमिका पूर्वीपासून मोलाची राहिली आहे. शाळेत मुले ठराविक वेळ असतात. या वेळेत आजकालचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांना जिकिरीचे ठरते. त्यात उजळणीला वेळ मिळत नाही. तसेच गृहपाठ बंद केला तर मुले मैदानी खेळांऐवजी टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया ह्या वेळखाऊ संसाधनांकडे वळण्याची भीती व शक्यता अधिक आहे. गृहपाठातून मुले शाळेत व घरी अभ्यासाच्या साखळीत बांधून राहतात. मुलांना अभ्यासाची एक प्रकारची ओढ व सवय राहते. त्यामुळे गृहपाठ बंद करण्याचा निर्णय न घेणे उत्तम!
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment