काँग्रेस सावरण्यास वेळ जाईल

धर्मनिरपेक्षवादी विचारातून पुढे आलेला काँग्रेस पक्ष आज बऱ्याच अंशी खुंटलेला दिसतो. देशातील अनेक राज्यांमध्ये या पक्षाचा प्रभाव कमी झालेला आहे ही बाब  खरी आहे. प्रतिभावंत व विचारशील नेतृत्वाच्या अभावामुळे आज जुने काँग्रेसी नेतेदेखील पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न न करता अन्य वाटा शोधताना दिसत आहेत. अनेक दशके देशावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उरलेले नाही. गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या केंद्रस्थानी केवळ गांधी घराणेच राहिले आहे. मात्र जनतेला बदल हवा असतो. नवे विचार, नवी धोरणे व नाविन्यपूर्ण योजना मांडणारे सत्तास्थान लोकांना हवे असते. भाजपने सत्तेत आल्यावर घेतलेले निर्णय लोकांच्या अपेक्षांना उतरत असल्याने आज काँग्रेसला सक्षम पर्याय भाजपच्या रुपात मिळालेला आहे. यातून सावरण्यासाठी आता काँग्रेसला फार मोठे अंतर्गत बदल घडवावे लागतील. मग ते बदल नेतृत्वात असतील किंवा विचारांमध्येसुद्धा.. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त