निसर्गसंतूलन राखण्‍याचा जवळचा मार्ग म्‍हणजे वृक्षलागवड

रोटरी क्‍लबमार्फत सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण येथे वृक्षलागवड

निसर्गाच्‍या होत असलेल्‍या अपरिमीत हानीमुळे निसर्गचक्र व ऋतुचक्र बिघडले आहे. अनेकदा मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण होते तर काही भाग पावसाविना दुष्‍काळी राहतात अशी परिस्‍थीती आहे. निसर्गाचे संतूलन राखण्‍याचा एकच मार्ग आपल्‍याकडे उपलब्‍ध आहे व तो म्‍हणजे निसर्गसंपदा म्‍हणजेच वृक्षसंपदा जोपासणे. यासाठी वृक्षागवडीची चळवळ व्‍यापक व्‍हायला हवी. अशाच प्रकारे वृक्षलागवडीच्‍या ध्‍येयाने अनेक निसर्गप्रेमी पदरमोड करुन वृक्षवाढीसाठी प्रयत्‍नशील असतात. मुळगाव आंबिस्ते, जि. पालघर  येथे जन्मलेले असेच एक वेगळे व्यक्तिमत्व वाडा तालूक्‍याला लाभले आहे. वाड्यातून शिक्षण घेत शहराकडे जाऊन उच्च शिक्षण घेऊन मुंबई युनिव्हर्सिटी सारख्या शिक्षणाच्या माहेरघराचे कुलगुरू पद प्राप्त करून घेणारे डॉक्टर अरुण सावंत सर यांच्या संकल्पनेतून तसेच अध्यक्ष रोटरी क्लब डाऊन टाऊन सि लँड डॉक्टर सरोज वर्मा, रोटरी क्लब सदस्य अजय कासोटिया यांच्या माध्‍यमातून वृक्षलागवडीचा अनोखा वसा हाती घेण्‍यात आलेला आहे. नुकतेच त्‍यांच्‍या सहकार्यातून केळठण, जिल्‍हा पालघर येथील सरस्वती गणपत पाटील विद्यालय केलठण या शाळेत वृक्ष लागवड अभियान राबविण्‍यात आले. नदीच्‍या किनारी वसलेली ही शाळा अतिमुसळधार पावसात अनेकदा पुरासारख्‍या नैसर्गिक आपत्‍तीची शिकार झालेली आहे. यात शाळेतील साहित्‍याचे व कागदपत्रांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या सभोवतालीचा परिसर हा निसर्गमय व सुंदर राहावा आणि पुरामुळे शाळेचे वारंवार होणारे नुकसान रोखण्‍यासाठी अरुण सावंत सरांच्‍या प्रेरणेतून व रोटरी क्‍लबच्‍या माध्‍यमातुन शाळेच्‍या परिसरात वृक्षारोपन मोहिम राबविण्‍यात आली. यावेळी शाळेतील मुलांनीदेखील हिरीरीने सहभाग घेत शेकडो झाडे शाळा परिसरात लावली. त्‍याचबरोबर शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्‍या कामाचादेखील श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्‍यात आला. त्यांच्यासमवेत या परिसरातील एक समाजसेवी संस्था लर्निंग स्पेस फाउंडेशन यांचे अध्यक्ष नितीनजी ओरायन हेदेखील उपस्थित होते. सरस्‍वती गणपत पाटील विदयालय ही आदिवासीबहूल शाळा असून शाळेतील सर्व मुले गरीब व सामान्‍य घरातील आहेत. तथापि, शाळेतील शिक्षकांच्‍या अथक परिश्रमातून मुलांची प्रगती दिवसेंदिवस दैदिप्‍यमान ठरत असुन तालूका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवरील अनेक स्‍पर्धांमध्‍ये शाळेतील विदयार्थी चकमदार कामगीरी करत शाळेचे व तालूक्‍याचे नाव उंचावत आहेत. याचीची दखल घत रोटरी क्‍लब सारख्‍या संस्‍था शाळेच्‍या पर्यायाने मुलांच्‍या विकासासाठी पुढाकार घेत सढळ हस्‍ते मदत करत आहेत ही बाब नक्‍कीच समाधानाची बाब आहे. संस्‍थेच्‍या या सहकार्यामुळे शाळा प्रशासन, संस्‍थाचालक, विदयार्थी व पालकांनी संस्‍थेचे आभार मानले आहेत.

 

वैभव पाटील     
























Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त