यामुळे महाराष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका

संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही मुळात भाषिक, अध्यात्मिक संस्कृती व विकासाच्या मुद्द्यावर झाली. मात्र त्यानंतर आलेली सरकारे व एकंदरीत राजकीय परिस्थितीने सातत्याने राज्याला हादरे दिले आहेत. राज्य व केंद्राच्या महसुलातून कोट्यवधींचा खर्च दरवर्षी करूनही राज्याच्या अनेक भागांत विकासाची गंगा पोहोचली नाही. अन्न, पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत गरजांसाठी देखील तेथील लोकांना झगडावे लागत आहे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात झालेली स्थलांतरे राज्याच्या मुळावर उठली आणि इथला स्थानिक भूमिपुत्र अस्वस्थ झाला. कर्नाटक, तेलंगणा यांसारख्या सीमावर्ती भागांमध्ये लोक उघड उठाव करू लागले  आहेत. विदर्भातील काही भागांत लक्षली चळवळी अजूनही तग धरून आहेत. मराठवाडा, विदर्भ ह्या प्रांतातील काही लोक स्वतंत्र राज्याची मागणीसाठी आग्रही आहेत. ही परिस्थिती आजवरच्या राज्य सरकारांच्या उदासीनतेने उत्पन्न झाली आहे. सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांकडे होत असलेले दुर्लक्ष, त्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यातील चालढकलपणा उद्या महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यास कारणीभूत ठरू शकेल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा