बाईक राईडद्वारे पर्यटनातून छंद जोपासणारे श्री गजानन पाटील

हौशी हॅप्पी रायडर – गजानन पाटील

आमचे मित्र श्री गजानन पाटील हे एक हौशी बाईक रायडर. आजवर हजारो किलोमिटरचा प्रवास त्यांनी त्यांच्या विशेष अशा रॉयल एनफिल्ड हिमालयन या मोटरसायकलने केलेला आहे. मागील वर्षी त्यांनी छंद म्हणून मुंबई ते लेह-लडाख-अमृतसर अशी बाईक राईड केली होती. त्यांना पर्यटन व ट्रेकींगची प्रचंड आवड आहे. ही पर्यटनाची आवड ते आपल्याल बाईकव्दा‍रे पूर्णत्वास नेतात. आजवर त्यांनी शिवनेरी, हरिहर गड, प्रबळगड, लोहगड, कळसूबाई, सादन व्हाली, भीमाशंकर, गोरखगड, कलावती दूर्ग, हरिश्चंद्र गड अशा अनेक ठिकाणी ट्रेकिंग केलेली आहे. पर्यटन करताना त्यांना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचीही भारी हौस आहे. त्यांच्या प्रत्येक पर्यटनाचे त्यांनी रेकॉर्डींग करुन त्यांच्या Happy Rider Gajanan Patil हया यूटयूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत.
गजानन पाटील यांची नियुक्ती सध्या् ठाणे शहर पोलिसअंतर्गत नागपूर हिवाळी अधिवेशन बंदोबस्ता्साठी करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांनी नुकताच मुंबई ते नागपूर असा ८१० किलोमिटरचा प्रवास त्यांच्या आवडीच्या‍ रॉयल एनफिल्ड हिमालयन या बाईकनेच केला व नागपूर ते मुंबई हा परतीचा प्रवासदेखील ते बाईकनेच करणार आहेत. मीदेखील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी नागपूर येथेच कार्यरत आहे. या दरम्यान त्यांनी आवर्जुन माझी आम्ही राहत‍ असलेल्या  दिक्षाभुमी येथील आरोग्य  विभागाच्या  प्रशिक्षण हॉस्टेेलमध्ये भेट घेतली. गजानन पाटील व माझी ओळख गेल्या काही वर्षांपूर्वीचीच. आमचे मित्र श्री गणेश हिरवे सर यांच्या जॉय ऑफ गिव्हींग सोशल ग्रुपच्या  माध्यमातून त्यांची ओळख व मैत्री झाली. नोकरी करुन पर्यटन व तेही बाईकच्या माध्यमातून करताना यूटयूब चॅनलव्दा‍रे तो प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची असलेली आवड आम्हाला विशेष भावते. त्यामुळे त्यांचा आम्हा‍ला नक्कीच हेवा वाटतो. मागील वर्षी आम्ही  जॉयच्या  माध्यममातून पालघर जिल्हयातील काटी या गावातील शाळेमध्ये केलेल्या‍ सामाजिक उपक्रमामध्ये ते बाईकवरच उपक्रमस्थळी पोहोचले होते व या प्रवासाचा तसेच कार्यक्रमाचा व्हिडीओ बनवून त्यांनी यूटयूबवर अपलोड केलेला आहे. वृत्तपत्रलेखनाच्या माध्यामातून एकीकडे आम्ही आमची प्रकाशीत पत्रे व लेख सोशल माध्यमांवर शेअर करत असतो तर दुसरीकडे गजानन पाटील आपले बाईक राईडव्दारे केलेल्या पर्यटनाचे व्हिडीओ शेअर करत असतात ज्यामुळे विविध नवनवीन ठिकाणांची माहिती सर्वांना मिळते. एकंदरीत गजानन पाटील यांचा हा उपक्रम हौशी व छंदीष्ट पर्यटकांसाठी नक्कीच अनुकरणीय असुन त्यांंनी वयाच्या ५८व्या वर्षापर्यंत जोपासलेली आपली ही अनोखी आवड अधिकाधिक काळ जोपासावी असे मनोमन वाटते.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई             

Comments

  1. जबरदस्त हौशी हॅप्पी रायडर आमचे मित्र गजानन पाटील👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त