सार्वजनिक स्थळांना महापुरुषांची नावे द्यावीत

औरंगाबाद असो की अहमदनगर, मुघल साम्राज्यातील अनेक राज्यकर्त्यांची नावे देशातील अनेक स्थळांना देण्यात आली आहेत. शिवछत्रपतींनी मराठे - मावळ्यांना सोबत घेत जीवाची बाजी लावत स्वराज्य मिळवले व अन्याय, अत्याचारी राजवट संपुष्टात आणली. मात्र शहरांना व विविध ठिकाणांना दिलेली परकीय आक्रमकांची नावे मात्र अनेक शतकांनंतरही तशीच आहेत. ती न बद्दलण्यामागे काय राजकारण आहे हे मात्र अनाकलनीय आहे. मुंबईतदेखील अनेक रेल्वे स्थानकांना ब्रिटिश कालीन नावे देण्यात आली आहेत ज्यांचा पूर्वातिहास व कारणे कुणालाही जाणून घ्यायची इच्छा नाही. वास्तविक अशी सत्तास्थाने संपल्यानंतर त्यांची नावेदेखील पुसून देश व जनसेवेसाठी जीवन खर्ची घातलेल्या राष्ट्रभक्त, महापुरुष यांची नावे अशा स्थळांना द्यायला हवीत. मुळात ती लोकांमध्ये रुजवायला हवीत. मात्र दुर्दैवाने इथे अशा ठिकाणांची नावे बद्दलण्यासाठीदेखील मोठे राजकारण केले जाते. महापुरुषांच्या नावाचा वापर सोयीने केला जातो व वापर झाल्यावर मुद्दा सोडून दिला जातो. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे अध्यात्मिक, ऐतिहासिक वारसा जोपासणारे राज्य आहे. त्याचे प्रतिबिंब येथील येथील गाव, जिल्हे, शहरे, रेल्वे स्थानके यांच्या नावात दिसायला हवेच.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त