वाहनचालक अशोक डावरे आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त
आरोग्य सेवा आयुक्तालयातील वाहनचालक श्री अशोक डावरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुग्रास भोजनाची मेजवानी आज आयोजित केली होती. ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून श्री डावरे आरोग्य सेवेतून निवृत्त होत आहेत. आपल्या सेवेतील तब्बल २० वर्षे त्यांनी मंत्री कार्यालयात सेवा बजावली हे विशेष. अगदी आरोग्य संचालकांपासून सहाय्यक संचालकांच्या वाहनांवर चालकाची जबाबदारी पार पाडताना कधीही आपल्या सेवेला त्यांनी गालबोट लागू दिले नाही. अत्यंत निष्कलंक व निर्दोष सेवा बजावलेल्या डावरे यांच्या चेहऱ्यावर आपल्या सेवेला पुरेपूर न्याय दिल्याचे समाधान स्पष्ट जाणवत होते. योगायोगाने आज त्यांचा वाढदिवसदेखील होता. सेवानिवृत्तीनन्तरचे आयुष्य भारत भ्रमण करण्यात घालवणार असल्याचा अनोखा संकल्प त्यांनी केला आहे. आज अगदी सहकुटुंब ते कार्यालयात उपस्थित होते व प्रत्येक कर्मचाऱ्याला जेवण मिळाल्याची आवर्जून खातरजमा करताना दिसले. असो, श्री डावरे यांच्यासारखे शासकीय सेवेत कुठलाही डाग लागू न देता सहीसलामत निवृत्त होणारे कर्मचारी नक्कीच एक आदर्श निर्माण करतात. आज भोजन झाल्यावर सहकाऱ्यांसह त्यांची कार्यालयाच्या टेरेसवर भेट घेतली व त्यांना शुभेच्छा देत सवयीप्रमाणे वाचनीय पुस्तक भेट दिले. श्रीयुत डावरे यांना उर्वरित निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
वैभव
Comments
Post a Comment