हा ट्रेंड योग्य नव्हे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
चित्रपटांना विरोध करण्याचा नवा ट्रेंड सध्या समाजात रुजू होत चाललाय. भावना दुखवण्याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांना राजकीय, सामाजिक विरोध झाला. मात्र त्याने त्या चित्रपटाची प्रसिद्धी कमी होण्याऐवजी त्या चित्रपटाबद्दलची दर्शकांची उत्सुकता अधिकच वाढल्याचे दिसून आले. हर हर महादेव या चित्रपटाने ऐतिहासिक कथानकावरून वाद अनुभवला तर अश्लीलतेवरून व धर्मभावनांवरून नुकत्याच रिलीज झालेल्या बॉलिवूडच्या पठाण चित्रपटालाही मोठा विरोध झाला. वास्तविक एखादा चित्रपट तयार करण्यासाठी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांची मोठी मेहनत व गुंतवणूक त्यामागे असते. चित्रपट प्रदर्शित करावा की न करावा यासाठी सेन्सॉर बोर्ड कार्यरत आहे. मात्र सेन्सॉरने हिरवा कंदील देऊनही चित्रपटांवरून वाद उद्भवणार असतील तर त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. अनेकदा निर्माण होणारे वाद चिरकाल टिकत नाहीत. सवंग प्रसिद्धीसाठी त्याचा वापर करून नंतर ते वाद आपोआप शमवले जातात. फारच अपवादात्मक परिस्थितीत चित्रपटातील वादग्रस्त चित्रीकरण बदलले अथवा काढून टाकले जाते. त्यामुळे अनावश्यक वाद हे टाळायलाच हवेत. चित्रीकरण अथवा कथानकाबाबत शंका, चुक वाटत असल्यास सेन्सॉरकडे दाद मागण्याचे प्रयोजन असायला हवे. त्यासाठी चित्रपट बंद पाडणे, मारहाण, तडफोड करणे समर्थनीय ठरू शकत नाही. या क्षेत्रातील जाणकारांनी याचा गांभीर्याने विचार करावा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment