असंसर्गजन्य आजार - उपचारांआधी प्रतिबंध बरा

असंसर्गजन्य आजार – उपचारांआधी प्रतिबंध बरा
बदलत्या जीवनशैलीसह अनेक आजारही घराघरांत पोहोचले आहेत. लहान वयापासूनच वाढते वजन, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांच्या तक्रारी केल्या जातात. अपुरी झोप, वाढता ताण तणाव, जेवणाच्या बदलत्या सवयींमुळे हे रोग वाढत असले तरी त्यांची गांभिर्याने दखल घेणेदेखील तितकेच गरजेचे आहे. कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यांसारखे असंसर्गजन्य रोग वाढत असल्याने या रोगांचा प्रसार किती आहे, तसेच कोणत्या वयोगटामध्ये याची लागण झपाट्याने होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. ज्या रोगांचा प्रसार हा जंतूंच्या संसर्गातून होत नाही असे रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग.  राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणा-या अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एक चतुर्थांश इतकी घट करण्याचे उद्दिष्ट आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे जवळपास ६३ टक्के मृत्यूय होतात. प्रामुख्याने ३५ ते ६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये हे आजार आढळून येत असल्यांमुळे देशाच्या विकासावर याचा मोठा परिणाम संभवतो. देशात साधारणतः मधुमेह ६ टक्के, उच्चदाब १५ टक्के तसेच दर 1 लाख लोकसंख्येमागे कर्करोगाचे १०० रुग्ण आढळुन येतात. जिवनशैलीतील बदल, व्यायामाचा व हालचालीचा अभाव, आहारातील बदल, वाढता ताणतणाव, तंबाखू सेवन, धुम्रपान, मदयपान इत्यायदी गोष्टींमुळे व्याधींमध्ये वाढ होत आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा आरोग्य विभागाकडूनही वारंवार उपाययोजना व विविध प्रकारच्या मोहीम हाती घेण्यात येत आहेत.

असंसर्गजन्य आजारांमध्ये सर्वात धोकादायक आजार म्हंणजे कर्करोग. विशिष्ट प्रकारच्या रोग समूहास कर्करोग म्हणून संबोधले जाते. कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये वा अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कर्करोग मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ.

प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय हे नवीन उद्भवणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण कमी करतात. कर्करोग प्रामुख्या्ने जिवन शैलीतील बदलेल्या सवयींमुळे होणारा आजार आहे. कर्करोग प्रतिबंधासाठी तंबाखूजन्य पदार्थांचा त्याग, मदयपान सोडणे, संतुलीत व पौष्टीाक आहार, नियमित व्याायाम यासारखे उपाय फायदेशीर आहेत. कर्करोग होण्यास तंबाखू हा सर्वात धोक्याचा घटक आहे. देशातील एकूण कर्करोगाच्या प्रमाणापैकी ३४% कर्करोग तंबाखूमुळे होत असून सदर कर्करोग तंबाखू सेवन सोडण्याने थांबविता येण्यासारखे आहे. तंबाखु मध्ये सुमारे ४००० विविध रासायनिक घटक असून त्यापैकी कमीतकमी एकूण ४३८ घटकामुळे कर्करोग होत असतो. धुम्रपानामुळे फुफूस, स्वकरयंत्र्, अन्ननलिका व श्वसन नलिकेचा कर्करोग होतो तसेच धुम्रपान स्वादुपिंड, मूत्राशय, मुत्रपिंड, मुत्रनलिका गर्भाशय मुख कर्करोग होण्याचससुध्दा कारणीभूत आहे. तोंडाचा कर्करोग होण्या्स तंबाखू सेवन मुख्यतः कारणीभूत आहे. तंबाखु सोबत मदयपान हे कर्करोगाची संभावना वाढवणारे आहे. मदयपान सेवन थांबविण्या्स तंबाखू सेवन थांबविण्या साठीच्या उपाययोजना करायच्या असतात. या करिता वै‍यक्तिक व सामाजिक स्तरावर उपाय करायचे असून अंमली पदार्थावर कर वाढविणे, जनजागृती निर्माण करणे आणि मदयपान व तंबाखु सेवन करणाऱ्या व्यक्तींचे निर्व्यसनीकरण करुन त्यांना समुपदेशाने पाठींबा देणे आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या कर्करोगात ५ ते १० टक्के कर्करोग हे व्यक्तींच्या व्यवसायामुळे उद्भवतात. रबर, लाकुड, वस्त्र, सिमेंट व्यवसायातील कामागारांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे सिध्द झाले आहे. तसेच रासायनिक व औषधी कारखान्यांतील कामगार यांच्यात मूत्राशयाचा कर्करोग प्रामुख्यांने आढळून येते. संरक्षणात्मरक उपकरण जसे की, मास्क, हानिकारक तत्वांसोबत काम करतांना यंत्राचा वापर, हवा शुद्धीकरण यंत्राचा वापर इत्यादींमुळे कर्करोगजन्य घटकांशी संपर्क कमी करता येतो.

चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या आजारांचे वाढते प्रमाण भविष्यासाठी धोक्याची घंटा आ‍हे. प्रौढांमधील वाढत चाललेले हया आजारांचे प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे. वास्ताविक असंसर्गजन्य आजारांचे हे प्रमाण कमी होण्याची सध्यातरी चिन्हे नाहीत मात्र ते नियंत्रणात आणणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा  रुग्णालयांसह, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी असंसर्गजन्य आजार नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. हया शासकीय आरोग्य  संस्थां मध्ये रुग्णांना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. ‘उपचाराआधी प्रतिबंध बरा’ या उक्ती प्रमाणे असंसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी त्यांना प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे आहे व यासाठी लोकांमध्ये प्रबोधन हे अत्यंत महत्वाचे ठरेल. आरोग्य शिक्षणाच्या माध्यसमातून विविध आजारांना आळा घालता येऊ शकतो. त्यामुळे हे आरोग्य शिक्षण समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रबोधनकार, प्रसारमाध्यमे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.    


वैभव मोहन पाटील
कक्ष अधिकारी (अभियान संचालक कक्ष)
राष्ट्रीय आरोग्यि अभियान,
मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त