निसर्गसंपन्नतेचा अद्भुत अनुभव -

गोंदियाचे नैसर्गिक वैभव - नवेगाव बांध
गोंदिया जिल्हयातील नवेगाव बांध या निसर्गरम्य परिसराला भेट देण्याचा योग मागील महिन्यात आला. वन खात्याच्या अखत्यारील हा परिसर म्हणजे विदर्भाला लाभलेले नैसर्गिक वैभवच म्हणावे लागेल. हया राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे. डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटियाडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. हे राष्ट्रीय उदयान गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेले असुन नागपूर या उपराजधानीपासुन जवळपास १४० किमी आहे. निसर्गसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून या उद्यानाला अत्यंत महत्व आहे. या उद्यानाची निसर्गसंपदा खरंच अतुलनीय असुन येथील नयनरम्य दृश्ये, शुद्ध आणि ताजी हवा यांचा आनंद उपभोगण्याकरीता नवेगाव येथे भेट देणे आवश्यक आहे. जैवविविधता संरक्षण करण्याच्या दृष्टिने देखील या उद्यानात प्रचंड क्षमता आहे. या राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्यास वनस्पती आहेत. नवेगाव राष्‍ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या २०९ प्रजाती आणि २६ सस्तन प्रजाती आहेत ज्यात वाघ, बिबळ्या वाघ, जंगली मांजर, कस्तुरी मांजर, पाम कॅव्हेट, लांडगा, कोल्हा, हरीण यांचा समावेश आहे. वन्यजीव निरीक्षण आणि छायाचित्रीकरण करणेकरीता उद्ययानात वॉच केबिन आणि वॉच टॉवर्स आहेत. नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, कोल्हा, बिबट्या, अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात. यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्ग साहित्यिक  मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. आम्ही  नागपूरातून शनिवारी तलाव परिसरातील विश्रामगृहात रात्रीचा मुक्कावम केला आणि रविवारी सकाळी सहा वाजल्यापासुन दहा वाजेपर्यंत या राष्ट्रीय उदयानात जंगलसफारी केली. यात अनेक प्राणी, पक्षी या ठिकाणी पाहता आले. नवेगाव बांध तलावाच्या सभोवतलचा परिसरदेखील खुपच सुंदर व नयनरम्य असुन तलावापासुन जवळच वरच्यात बाजूला एक सुंदर उदयान विकसीत करण्यात आले आहे. तलावात पर्यटकांसाठी बोटींगची व्‍यवस्‍थादेखील उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. या तलावाची निर्मिती सुमारे ५०० वर्षांपूर्वी कोलू पाटील यांच्‍या पुढाकाराने केली असल्‍याची नोंद असुन हा तलाव सात डोंंगराच्‍या खिंडीत मातीने लांबलेला आहे. येथील पाण्‍याची खोली ७५ फुट असुन रानबदके,कमळ व हंस यांसाठी हा तलाव प्रसिध्‍द आहे. तलावासमोरच ग्रीन पार्क या नावाने भलेमोठे हॉटेल नुकतेच उघडण्यात आले असुन या ठिकाणी अनेक प्रकारचे खादयपदार्थ व जेवण पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. या हॉटेलच्याा माध्यमातुनच या परिसराचे व उदयानाचे सौंदर्य वाढवण्या‍साठी प्रयत्न  करण्यात येत आहेत. पर्यटन व हॉटेल व्यणवसायातुन येथील अधिकाधिक स्थानिकांना रोजगार उपलब्ध  करुन देण्यााचा मनोदय या हॉटेलचे चालक सुनिल तरोणे व्यक्त‍ करतात. पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे स्थानिक लोकांना या ठिकाणी चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. अनेक महिला येथे चणे, फुटाणे, भेळ, रानमेवा व इतर खदयपदार्थ घेऊन विक्रीसाठी बसलेल्या  दिसतात. पहाटेच्या वेळेस येथील कडाक्याच्या थंडीचा अनुभव अंगावर शहारे आणणारा ठरला. त्यात वनखात्यावच्या  बसमधुन केलेली जंगलसफारी एका वेगळया अनुभुतीचा आनंद देणारी होती. सकाळची न्यााहारी व दुपारच्या जेवणाचा आस्वाद ग्रीन पार्क हॉटेलमध्येच घेत आम्ही इटियाडोह या जलाशयासदेखील भेट दिली आणि नवेगाव बांधच्या अविस्मरणीय अनुभवाची शिदोरी घेऊन सायंकाळच्या सुमारास पुन्हा नागपूरची वाट धरली.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त