यासाठी प्रबोधन आवश्यक

मोबाईल क्रांतीच्या युगात आजची तरुणाई वेगाशी स्पर्धा करू लागली आहे. सुधारलेल्या अर्थव्यवस्थेत मुलांना वाहनेही सहज उपलब्ध होत असल्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये परवाना नसताना वाहने हाकण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यात नवनवे मोबाईल इंटरनेटसह हाती असल्याने वाहने चालवण्याचा इव्हेंटदेखील लाईव्ह करण्याचा घातक प्रयत्न तरुणाईकडून केला जातो. त्यात वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. वाहतूक विभागाकडूनही यात फार मोठा हस्तक्षेप किंवा सातत्यपूर्ण व पारदर्शक कारवाई दिसून येत नाही. यामुळे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण धक्कादायक आहे. फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर लाईव्ह व्हिडीओ दाखवण्याचे प्रावधान असल्याने प्रत्येक प्रसंगाचे इव्हेंट लाईव्ह वा रेकॉर्ड करण्याचे फॅड वाढत आहे. यातून अपघातांचे दुर्दैवी प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. प्रामुख्याने वाहन चालवताना परिस्थिती व वेगाचे भान राहत नसल्याने अनियंत्रित ड्रायव्हिंग अनेकांच्या जीवावर उठत आहे. यासाठी वाहतूक नियम तर अधिक कडक करावेच लागतील मात्र पालक-पाल्यांचे संभाव्य धोक्यांबाबत प्रबोधनदेखील गरजेचे आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त