आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोग्य भवन येथे उत्साहात पार पडल्या. मर्यादित षटकांच्या अंडरआर्म पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धांमध्ये आरोग्य भवनमधील विविध विभागांत काम करणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला. एकूण आठ संघांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेत प्रतापगड या संघाने अंतिम विजेतेपद तर रायगड या संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून जितेंद्र नागवेकर, गोलंदाज म्हणून संदीप सावंत तर अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून संदेश मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूचा एक वाचनीय पुस्तक भेट देऊन सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला. या स्पर्धांमध्ये विभागातील ७० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धांसाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ संजीवकुमार जाधव, डॉ दुर्योधन चव्हाण, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री शैलेश पाटणकर यांनी भेट दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक समिती सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कर्मचाऱ्यांचा कामातील उत्साह वाढवण्यासाठी, सुदृढतेसाठी तसेच टीम वर्क म्हणून कार्यरत राहण्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा उपयुक्त असल्याचे मत यावेळी डॉ चव्हाण यांनी व्यक्त करत कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढवला.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त