नव्या विषाणूची चिंता

लोकांना कोरोनाचा विसर पडत जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा एका नव्या व्हायरसने सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. H3N2 या व्हायरसचा प्रसार सध्या जोरात होत असून देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'H3N2' या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात आता या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. संसर्गाने पसरणाऱ्या ह्या विषाणूचा प्रभाव मोठा असल्याने सार्वजनिक प्रवास व कार्यक्रमांमध्ये काळजी घेण्याची गरज भासू लागली आहे. मास्कचा वापर आपल्याला ह्या संसर्गापासून दूर ठेवू शकतो. त्यामुळे सार्वजनिक स्थळांवर वावरताना मास्कचा वापर करणे हितावह आहे. त्यामुळे भविष्यात या विषाणू बाधित रुग्णसंख्या वाढू द्यायची नसेल व सरकारी निर्बंधांत जायचे नसेल तर सर्वांनी योग्य काळजी घेतलीच पाहिजे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त