घनसोलीत प्रशांत पाटील मित्रमंडळाच्या वतीने सन्मान

घनसोलीत प्रशांत पाटील मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन नुकतेच आमदार मा श्री गणेश नाईक, मा नगरसेविका कमलताई पाटील, सुवर्णाताई पाटील यांच्या उपस्थितीत सेंट्रल पार्कमध्ये करण्यात आले होते. या प्रसंगी नवी मुंबईतील अनेक नामांकित पत्रकारांसोबतच घणसोलीतील वृत्तपत्र लेखक म्हणून घणसोली नगरीचे माजी नगरसेवक श्री प्रशांत दादा पाटील यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. तसेच यावेळी पार्कमध्ये आमदार निधीतून महिलांसाठी भव्य व्यायामशाळा उभारण्याचेदेखील आमदार श्री गणेश नाईक यांनी जाहीर केले. यावेळी स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवणे, स्मशानभूमी उपलब्ध करणे, सेंट्रल पार्कमधील मैदानाचे भाडे कमी करणे, तरणतलाव सुरू करणे या मागण्या आमदार महोदयांसमोर करण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त