डिजिटल भारत

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या युनायटेड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) द्वारे पेमेंट करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे किरकोळ व घाऊक पद्धतीत रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. आज किरकोळ बाजारात बहुतांश लोक निरनिराळ्या यूपीआय अँपद्वारे दुकानदारांचे पेमेंट करताना दिसतात. यात रोखीचे व्यवहार दुरापास्त झालेले आहेत. ह्या डिजिटल पेमेंट पद्धतीचा लाभ जसा नागरिकांना मिळत आहे तसाच तो व्यापारी, व्यवसायिकांनाही होत आहे. आज देशातील जवळपास ७४ टक्के व्यवहार हे यूपीआय द्वारे होत आहेत जे २०२६ पर्यंत ८८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यात ६.२७ लाख कोटींचे व्यवहार देशात यूपीआय द्वारे झालेले आहेत. यात दैनंदीन सरासरी व्यवहारांची संख्या ३६ कोटी रुपये आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ऑनलाइन पेमेंट वर्ग करणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. नागरिकांच्या सजकतेने व ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्याच्या कृतीमुळे देश खऱ्या अर्थाने डिजिटल भारत म्हणून मार्गक्रमण करत आहे.  डिजिटल व्यवहारात देशाची सुरू असलेली वाटचाल आश्वासक असून लवकरच यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांत देश जगभरात अग्रस्थानी असेल यात शंका नाही. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त