एसटी भाड्यात महिलांना सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह पण..

महिला प्रवाशांना निम्म्या भाड्यात एसटी प्रवास उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र सदरची सूट ही केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत व सर्वसामान्य महिलांसाठी असायला हवी. ज्या महिला आलिशान आयुष्य जगतात त्यांना वास्तविक एसटी प्रवासाची गरजच नाही. तसेच एसटीची आजची अवस्था पाहिली तर अगोदर एसटी प्रवास आरामदायक व सुरक्षित करण्यावर भर द्यायला हवा. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यादेखील सरकारसमोर आ वासून उभ्या आहेत. यासाठी सरकारने एसटी महामंडळाला भरीव मदत करायला हवी. असो, राज्य सरकारचा हा निर्णय राज्यातील महिलांसाठी आनंददायी असून अशाच प्रकारे आता रेल्वे, मेट्रो, विमान यासारख्या प्रवाशी वाहतुकीमध्ये महिलांना विशेष सवलती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हरकत नाही. तसेच जीवनावश्यक वस्तू व गॅसच्या किमतींवरदेखील सरकारी सूट देऊन त्यांच्या किंमती आटोक्यात आणून गृहिणींचा बजेट आवाक्यात आणावा अशी अपेक्षा आहे.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त