समृद्धी बनतोय मृत्युचा सापळा

समृद्धी महामार्ग सध्या वेगाशी स्पर्धा करणारा ठरत आहे. ज्या उद्देशाने या महामार्गाची निर्मिती केली गेली त्याचे मोजमाप होणे अजून बाकी असताना या मार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धीचे उदघाटन झाल्यानंतर आजवर तब्बल ५३ अपघात या महामार्गावर झालेले आहेत. या अपघातांमध्ये डझनभर लोकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील गावे जवळ करणारा हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय अशी अवस्था झाली आहे. यातील बहुतांश अपघात वेगाचे नियम न पाळल्याने झाले आहेत. कारसाठी १२० तर जड वाहनांसाठी ८० किमी प्रतितासाची मर्यादा असताना या ठिकाणी वेग व लेनची शिस्त पाळली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो त्या जिल्ह्यातील आरटीओ विभागाने वाहतुकीचे नियम पाळले जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे व सतर्कता दाखवणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या बाबतीत शिस्त आणली नाही तर अनेकांसाठी लाभदायी ठरणारा हा महामार्ग कित्येकांसाठी जीवावर बेतनारा ठरेल यात शंका नाही. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त