अशा बांधकामांवर कारवाई व्हायलाच हवी

माहिम येथे उभारण्‍यात आलेल्‍या अनधिकृत दर्ग्‍याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्‍याच्‍या सभेत चलचित्रफित दाखवून आक्षेप घेतल्‍यानंतर तातडीने या बांधकामावर पालिकेमार्फत कारवाई करण्‍यात आली. खरेतर अशी अनेक धार्मिक स्‍थळे अनधिकृतरित्‍या जागोजागी उभी राहीलेली आहेत. अशी धर्मस्‍थळे नंतर लोकांची श्रध्‍दास्‍थाने व मोठया आर्थिक उलाढालीची केंद्रे बनतात. खरेतर अशा अनेक संस्‍थावर सरकारी नियंत्रण आणण्‍यात आलेले आहे. मात्र अशा प्रकारे धार्मिक संस्‍थांवर शासकीय नियंत्रण आणण्‍याची बाब हिंदू धर्मस्‍थळांव्‍यतिरीक्‍त इतरत्र फार अपवदानेच होते. अशा धर्मस्‍थळांमध्‍ये राबविले जाणारे उपक्रम, शिकवण, अंतर्गत व्‍यवस्‍थापन याबाबत कमालीची अनभिज्ञता राहते. ही बाब शांतता व सुरक्षा व्‍यवस्‍थांना बाधक ठरत आहे. मोक्‍याच्‍या व दुर्लक्षित जागा हेरुन त्‍या ठिकाणी अनधिकृतरित्‍या श्रध्‍दास्‍थान बनवणे लोकांच्‍या श्रध्‍देशी खेळण्‍याचा प्रकार असुन यामुळे भविष्‍यात संघर्ष व कायदा सुव्‍यवस्‍थेची परिस्‍थीती निर्माण होऊ शकते. त्‍यामुळे समाज, धर्म, कायदा, नियम  व देशाचे स्‍वास्‍थ्‍य बिघडवणा-या धर्मस्‍थळांवर कारवाईची मागणी समर्थनीयच ठरते भले ती कथीतरीत्‍या ‘’स्क्रिप्‍टेड’’ असल्‍याचे म्‍हटले जात असले तरी.  

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त