सर्वच ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ

भेसळयुक्‍त पदार्थांच्‍या गुणवत्‍तेचा मुददा अत्‍यंत संवेदनशीलन असुन लोकांच्‍या आरोग्‍याशी निगडीत आहे. आज गल्‍लोगल्‍ली किराणा व तत्‍सम पदार्थांच्‍या दुकानांमध्‍ये लटकवण्‍यात आलेली प्‍लॅस्‍टीकची खाऊची चमचमीत पाकिटे ब्रॅंडेड पाकीटांपेक्षा स्‍वस्‍तात उपलब्‍ध होतात. त्‍याचा दर्जा सुमार असुन लोकांच्‍या प्रामुख्‍याने लहान मुलांच्‍या तब्‍येतीशी खेळणारा आहे. दुधाच्‍या पिशव्‍यांची पाकीटेही निरनिराळया कंपन्‍यांची निरनिराळया किंमतींना मिळतात. त्‍यांच्‍या गुणवत्‍तेबददलही शंका निर्माण होते. अगदी जिवनावश्‍यक वस्‍तुंपासुन ते खादयपदार्थांपर्यंत सर्वच बाबतीत सर्रास आढळुन येणारी ही भेसळ लोकांच्‍या जीवनमानाशी खेळणारी असुन एफडीएने याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्‍यात त्‍याचे उग्र परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील एव्‍हढे नक्‍की. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त