कोरोना अजून संपलेला नाही

महाराष्ट्रातून नाहीसा होत चाललेला कोरोना पुन्हा एकदा शिरकाव करू लागला आहे. रोज शेकडोंच्या संख्येने कोरोना रुग्ण राज्याच्या विविध भागांमध्ये आढळत आहेत. सध्या तब्बल सात हजारांच्या वर रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यावरून कोरोना अजून संपलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी योग्य काळजी व वेळेत उपचार घेतले नाहीत तर तो जीवावर बेतू शकतो. गेल्या तीन वर्षांत राज्यामध्ये कोरोनाने जवळपास दीड लाख रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवनवे येणारे प्रकार पाहता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. अधिक रुग्णसंख्या असलेल्या भागांत सर्वेक्षण मोहिमाही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेतलीच पाहिजे. व्यक्तिगत स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यासाठी सक्ती करावी लागू नये. संसर्ग पसरू न देण्यासाठी योग्य काळजी व लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी व उपचार घेतले पाहिजेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना नाहीसा झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मात्र सध्याची रुग्णसंख्या पाहता कोरोना अजून संपलेला नाही हे सर्वांनी ध्यानात घेऊन वेळीच सावध झाले पाहिजे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त