छंद जोपासण्यासाठी सुट्ट्यांचा वापर करा
- Get link
- X
- Other Apps
शालेय मुलांना नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याअगोदर दरवर्षी दिड दोन महिने सुटटया मिळतात. या सुटटयांमध्ये बहुतांश मुलांना कुटुंबासह फिरायला जाणे, गावी जाणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. मात्र त्याशिवाय अनेक गोष्टी मुलांना या सुटटीमध्ये करता येण्यासारख्या आहेत. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. नवनवे तंत्रज्ञान अवतरत असल्याने त्या गतीने मुलांनी स्वतःला गतीमान केलेच पाहिजे. यासाठी संगणकीय तंत्रज्ञानातील अदययावत बाबी आत्मसात करण्याकडे कल असायला हवा. संगणकातील बेसिक गोष्टी तसेच नवनवे सॉफटवेअर, एप्लीकेशन्स शिकायला हवेत जे शाळाबाहय आहे. शाळांमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत त्या गोष्टी शिकण्यासाठी या सुटटीचा वापर करता येईल. हे सर्व करत असताना मुलांनी आपल्या आवडीनुसार आपले छंददेखील जोपासायला हवेत. वाचन, लिखाण, गायन, नृत्य, मैदानी खेळ, विविध प्रकारच्या सुप्त कलांना सुटटीच्या काळात चालना दयायला हवी. आज गावोगावी अनेक संस्था, तज्ञ व्यक्तींकडून बाल संस्कार शिबिरे, अभ्यासवर्ग, छंदवर्ग, उन्हाळी शिबीरे भरवली जात आहेत. या शिबीरांतूनदेखील अनेक गोष्टी शिकता येतात. मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे व त्यांना अभ्यासाव्यतिरीक्त आयुष्यात कामी पडतील अशा इतर अनेक गोष्टी शिकवण्याचे काम ही शिबीरे करतात. त्यामुळे त्यांचा लाभ मुलांनी घेवून वेळ सत्कारणी लावायला हवा. सजग, सुजाण, संस्कारी, निष्णात, अष्टपैलू व पारंगत मुले घडवण्यासाठी पालकांनी उन्हाळी सुटटयांचा वापर करायला हवा असे मत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment