मोठ्या प्रबोधनाची गरज
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
बदललेली जीवनशैली, पाश्चात्य सांस्कृतिचा अंगीकार, वाढत्या महत्वाकांक्षा, अपेक्षा, अहंकार, मतलबीपणा, स्वार्थ, मी पणा यामुळे नातेसंबंधातील गाठी सैल होत चालल्यात. याच गोष्टींमुळे काही काळ प्रेमाचा घालवल्यानंतर कालांतराने पती पत्नीच्या नात्यांमध्येही खटके उडतात. यात दोन्ही बाजू अडून बसल्यास होणाऱ्या खेचखेचीचा परिणाम थेट घटस्फोटात होतो. हल्ली प्रेमविवाहाचे फॅड वाढत असून जुळवून केलेली लग्ने फार अपवादानेच आढळतात. बहुतांश प्रेम विवाहांमध्ये कौटुंबिक किनार फारच कमी आढळते. त्यामुळे अशा प्रकारे झालेल्या लग्नांमध्ये मध्यस्थीची भूमिका साकारण्यात पुढाकार घेणारे नालतग नसल्यामुळे क्षुल्लक कारणांनी झालेल्या वादाचे पर्यावसानही फारकतीत होते. असे संबंध पुनश्च तात्काळ जुळून येण्याची शक्यताही फार कमी असल्याने नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने पती पत्नीचे वैवाहिक संबंध जुळून येत नसल्यास घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा एका प्रकरणात दिलेला आहे. अशा निर्णयांमुळे वैवाहिक गाठी अधिकच सैलावत जाणार आहेत. वास्तवीक घटस्फोटाच्या ज्या प्रकरणात कौटुंबिक सलोखा जपला जात नाही अशा प्रकरणांत समुपदेशक, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येईल. हिंदू संस्कृतीत विवाह व्यवस्था टिकणे फार महत्वाचे असून समाजातील जेष्ठ प्रबोधनकार, कीर्तनकार, कलावंत, विचारवंत, साहित्यिक, जाणकार, समुपदेशक, डॉक्टर्स, वकील, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन समाजप्रबोधन करण्याची भूमिका निभावायला हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment