चला पेटी शिकू या

बालसंस्कार शिबिरात घेतला पेटीचा आनंद 
पेटी वाजवणे ही खरंतर खूपच अवघड कला आहे मात्र नियमित सराव केला तर तुम्ही सराईतपणे ती आत्मसात करू शकता. पेटी लवकर शिकण्यासाठी स्वर ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी भरपूर सरावाची गरज आहे. अलंकार, राग, कॉर्डस यांचा सराव केल्यास, उत्तम प्रकारे रियाज केल्यास पेटी लवकर शिकता येते. तसेच पेटी शिकण्याकरता योग्य गुरु असणे महत्त्वाचे आहे. पेटी शिकण्याकरता तुम्ही ऑफलाईन, ऑनलाईन क्लास, तसेच यूट्यूब या माध्यमांचा वापर करू शकता. फक्त तुमच्याकडे पेटी असणे गरजेचे आहे. पेटी शिकणे किती दिवसात शक्य होईल हे सांगता येणे कठीण आहे, कारण आपण त्यात किती प्रावीण्य मिळेपर्यंत शिकणार आहात यावर ते अवलंबून आहे. नुकतेच आमच्या देवघर गावी बाल संस्कार शिबिरादरम्यान गेलो असता शिबिरातील पेटी पाहून ती हाताळणे मला आवरले नाही. मला पेटी वाजवता येते असे सांगण्याइतपत मला ती वाजवता येत नाही. एखादे गाणे वाजवून पाहिले तर तुटक वाटते. सराईतासारखा हात फिरत नाही. त्यासाठी अधिक वेळ क्लास आणि सराव करायला हवा होता, पण ते जमले नाही. पण आजही एखादे नवीन गाणे ऐकले की पेटीवरील बटने स्पष्ट दिसू लागतात. पण प्रत्यक्ष वाजवल्यावर मात्र तितके समाधान मिळत नाही. बाल संस्कार शिबिरात आमचे परमस्नेही श्री राम महाराज भोईर हे मुलांना पेटी शिकवतात. ते एक उत्तम गायक तर आहेतच पण उत्तम पेटीवादक देखील आहेत. त्यांची भजने ऐकताना एका अनोख्या अध्यात्मिक सहवासाची अनुभुती मिळते. त्यांच्या सानिध्यात शिबिरातील काही मुले पेटीवरील स्वारज्ञान बऱ्यापैकी शिकली मात्र त्यासाठी नियमित सराव व स्वरांचे खोलवर ज्ञान यावे लागेल. पेटी वाजवण्यात आपण किती तरबेज होऊ इच्छिता, यावर लागणारा वेळ अवलंबून आहे. पण फक्त स्वरज्ञान करून घ्यायचे असल्यास त्यासाठी फार काळ लागत नाही. आजच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी पेटी शिकण्याची कला इच्छा असूनही सर्वांना जमेलच असे नाही मात्र त्याचे साधकबाधक ज्ञान सर्वांना व्हावे व पेटी शिकण्याची इच्छा आपल्याही मनात जागृत व्हावी यासाठीच हे पेटीपुराण.. 

वैभव मोहन पाटील 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त